बटाटा हे आपल्या आहारातील एक महत्वाची फळभाजी आहे.तर पाहूया बटाटा लागवड कशी होते .
सर्वप्रथम शेत चांगले उभे आडवे नांगरून घेणे. एकरी कमीत कमी ५-६ ट्रॉली शेणखत पिस्करून घेणे. ट्रॅक्टरच्या साह्याने सरी पाडणे.बटाटा चे सुधारित वाण वापरणे.बटाट्याच्या दोन किंवा चार फोडी करून बुरशिरोधक द्रावणात बुडवून घेणे.
संपूर्ण किंवा कापलेले कंद 15-20 सेमी अंतरावर रिजच्या मध्यभागी 5-7 सेमी खोलीवर लावले जातात आणि मातीने झाकलेले असतात. बटाट्याचा बियाण्याचा दर हा लागवडीचा हंगाम, कालावधी, बियाण्यांचा आकार, अंतर इत्यादींवर अवलंबून असतो.
बटाटे उगवण्याचा ठराविक कालावधी बहुतेक जातींसाठी 90 ते 120 दिवसांचा असतो. सुरुवातीच्या हंगामातील वाण वाढण्यास अंदाजे 60-80 दिवस, मध्य-हंगामी वाण वाढण्यास 80-100 दिवस आणि उशिरा-हंगामी वाण वाढण्यास 100-130 दिवस लागतात.
पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे. त्यानंतर चार ते सात दिवसांनी पाणी द्यावे. पाणी देताना वरंबे दोनतृतीयांश पाण्यात बुडतील आणि जमीन ओलसर राहील अशा प्रकारे द्यावे. आंतरमशागत व मातीची भर देणे- लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे व राहिलेली खताची मात्रा देऊन मातीची भर द्यावी.
प्रति एकरी येणारा खर्च
बटाटा लागवडीसाठी एकरी 30,000-40,000 रुपये खर्च येतो, त्यापैकी 10,000-15,000 रुपये सिंचनावर खर्च होतो
प्रति एकरी उत्पादन
एकरी 11 ते 12 टन उत्पादन ते घेतात.
मिळणारा नफा.
उत्पादन सरासरी १० टन पकडले
मिळणारा भाव कमीत कमी १० रू पर किलो
१००००*१० = १०००००
येणारा खर्च ४०००० पकडला.
निव्वळ नफा १०००००-४००००=६००००.
दोन महिन्यात ६०००० रू एकरी नफा मिळतो.