पेरू लागवड तंत्रज्ञान

हवामान

पेरुची लागवड प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात केली जाते. कमाल तापमान कक्षा असणा-या प्रदेशात हे पीक चांगले येते. जास्त पावसाच्या तसेच दमट हवामानाच्या प्रदेशात देवी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.

जमीन

पाण्याचा उत्तम निचरा होणारी, हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत या पिकाची लागवड करावी. जमिनीची खोली किमान दोन फूट असावी.जमिनीचा सामू साधारणतः ६ ते ७.५ या दरम्यान असावा. चुनखडीयुक्त किंवा पाण्याचा निचरा न होणा-या जमिनीत या पिकाची लागवड करणे टाळावे.

लागवड

१) पारंपरिक पध्दत : या पध्दतीमध्ये जमिनीची

आखणी करून ६ x ६ मी. अंतरावर ६0 x ६0 x ६0 सें. मी. आकाराचे खड़े ध्यावेत. हे खड़े भरतांना १५ ते २0 किलो चांगले कुजलेले शेणखत, ५o0 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५ ग्रॅम फॉलीडॉल पावडर आणि माती या मिश्रणाने खडु भरून घ्यावेत व रोपाची लागवड करावी.

२) घन लागवड : या पध्दतीत ३ × २ मी.अंतरावर ५o × ५o × ५० सें.मी. आकाराचे खडे घ्यावेत. यामध्ये साधारणतः ५ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २.५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर, २५ ग्रॅम पीएसबी, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर आणि ५ ग्रॅम फॉलीडॉल पावडर पोयटा मातीत मिसळून या मिश्रणाने खडे भरून घ्यावेत व रोपाची लागवड करावी.

लागवड पद्धत प्रथम वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी
लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यानंतर (प्रती झाड ) जून ते जानेवारी (प्रती झाड ) जून ते जानेवारी (प्रती झाड ) जून ते जानेवारी (प्रती झाड )
घनबाग ७५:३०:३० ग्रॅम नत्र ,स्फुरद व पालाश +५ ग्रॅम शेणखत +२५ ग्रॅम प्रत्येकी अ्झोटोबॅक्टर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा १३०:७५:७५ ग्रॅम नत्र , स्फुरद  व पालाश +५ ग्रॅम शेणखत +२५ ग्रॅम प्रत्येकी अझोटोबॅकटर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा १३०:७५:७५ ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश +७ ग्रम शेणखत +५०ग्रम  प्रत्येकी अझोटोबक्टर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा २०५:११२:११२: ग्रम नत्र , स्फुरद व पालाश + १० ग्रम शेणखत + ५० ग्रम प्रत्येकी अझोटोबॅक्टर , पीएसबी आणि ट्रायकोडर्मा
पारंपारिक लागवड ९०:३०:३० ग्रम नत्र , स्फुरद व पालाश + १० ग्रम शेणखत + २५ ग्रम प्रत्येकी अझोटोबॅक्टर ,पीएसबी आणि ट्रायकोडर्मा १८०:६०:६० ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश + २० ग्रॅम शेणखत + २५ ग्रॅम प्रत्येकी अझोटोबॅक्टर , पीएसबी आणि ट्रायकोडर्मा २७०:९०:९० ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश + ३० ग्रम शेणखत + ५० ग्रम प्रत्येकी अझोटोबॅक्टर  पीएसबी आणि ट्रायकोडर्मा ४५०:१५०:१५० ग्रम नत्र , स्फुरद व पालाश + ४० ग्रम शेणखत +५० ग्रम प्रत्येकी  पीएसबी आणि ट्रायकोडर्मा

जाती सरदार (लखनऊ-४९) :

या जातीच्या पेरूची महाराष्ट्रात मोठया प्रमाणात लागवड केली जाते. या जातीच्या फळाचे सरासरी वजन २00 ते २५० ग्रॅम असून फळांचा रंग पिवळसर हिरवा असतो. फळ आकाराने मध्यम गोलाकार असून गर पांढरा व गोड असतो. या जातीत विद्राव्य घटकाचे प्रमाण सरासरी १२ ते १४ टक्के असते. या जातीपासून प्रती हेक्टरी पारंपरिक पध्दतीत २० ते २५ टन तर घनबाग लागवडीतून ४० ते ४५ टन उत्पादन घेता येते.

कीड व्यवस्थापन

फळमाशी

ओळख : प्रौढ माशी घरी दिसणा-या माशीसारखीच पण आकाराने लहान म्हणजे ५ ते ६ मि.मी. लांब असते. माशीचे मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचे असून पंख सरळ लांब असतात. या माशीच्या अळ्यांना पाय नसतात. या मळकट पांढ-या असून १० ते १२ मि.मी.लांब परंतू तोंडाच्या बाजूस निमुळत्या असतात. कोषावस्थेत त्या जमिनीत असतात. प्रौढ माशा अर्धपक्व फळात २ ते ३ मि.मी. खोल एक एक करून अंडी घालतात. एक माशी साधारणत: १o0 ते १५0 अंडी घालते. २ ते ३ दिवसात या अंडयातून अळ्या बाहेर पडतात आणि फळातील गर खातात. परिणामी अंडी घातलेल्या ठिकाणी फळे सडतात आणि गळतात. या अळ्या तापमानानुसार ५ ते २० दिवसानंतर १० ते १५ सें.मी. खोलीवर जमिनीत कोषावस्थेत जातात. साधारणपणे ८ ते १० दिवसात कोषातून प्रौढ माशा बाहेर पडतात. सर्वसाधारणपणे एका वर्षात अनेक पिढ्या तयार होतात.

व्यवस्थापन

  1. प्रादुर्भावग्रस्त फळे वेचून जमिनीत खोलवर पुरून टाकावीत.
  2. झाडाच्या सभोवताली जमिनीची वखरणी/कुदळणी करावी व मिथील पॅरॉथियॉन भुकटी जमिनीत मिसळावी.
  3. मिथील युजेनॉल/रक्षक सापळयांचा (एकरी १० ते १२) वापर करावा.
  4. प्रौढ माशांच्या बंदोबस्तासाठी २० मि.ली. मॅलॅथियॉन + २00 ग्रॅम मळी या प्रमाणात २० लिटर पाण्यातून बागेच्या सभोवताली फवारणी करावी. अगर प्लॅस्टिक डब्यात हे द्रावण जागोजागी झाडावर लटकावे.
  5. बागेत स्वच्छ, भरपूर सुर्यप्रकाश व खेळती हवा राहण्यासाठी हलकी छाटणी करावी.

पिठ्या ढेकूण

या किडीची पिले आणि प्रौढ लहान, चपटी व ३ ते ४ मि.मी. लांब असून शरीराभोवती मेणकट पांढरा रेशमी कापसासारख्या पदार्थ असतो. त्यामुळे कोड एकदम दिसून येत नाही. जमिनीतून अंड्यातून निघालेली पिल्ले झाडावर चढतात आणि नवीन पाने आणि फळांच्या देठाजवळ पोहचतात. तेथे ती एकाच ठिकाणी बहुसंख्येने एकत्रितपणे फळाच्या देठाजवळून तसेच फळाच्या मागील भागातून रस शोषण करतात. फळातील रस शोषण केल्यामुळे फळांची वाढ न होता ती गळतात; फळे वाकडी तिकडी होतात.

अ) उन्हाळ्यात झाडालगत नांगरणी केल्यास अंडी नष्ट होतात. काही पक्षी खातात तर काही सुर्याच्या उष्णतेने मरतात.

ब) या किडीच्या नियंत्रणासाठी जैविक व्हर्टिसिलियम-४0 ग्रॅम १oo मि.ली. दुधात मिसळून १० लीटर पाण्यातून फवारावे.

क) जमिनीच्या ३० सें.मी. वर खोडावर ग्रेिसचा पट्टा दिल्यास अगर चिकट जेल लावल्यास पिल्ले झाडावर चढणार नाहीत.

मावा

ही कोड पानाच्या खालच्या बाजूला समूहाने राहून सतत रस शोषण करतात. प्रौढ माव्यास बहुदा पंख नसतात. त्यामुळे प्रौढ आणि पिले या समूहात सारखीच दिसतात. त्यांचे शरीर नाजूक व कोमल असून शरीराच्या शेवटी शिंगासारखी एक जोडी असते. मादी मावा अंडी न देता सरळ पिल्लांना जन्म देतात. तसेच नर मादीच्या मिलनाशिवाय पिल्लांना जन्म दिला जातो. या किडींची पिले व प्रौढ समूहाने पानातून आणि कोवळया फुटीतून सतत रस शोषण करतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडतात, चुरगळल्यासारखी होतात व शेवटी पानगळ होते. परिणामी पेरू फळाच्या प्रतिवर विपरित परिणाम होतो.

उपाययोजना

माव्याच्या नियंत्रणासाठी ४ टक्के निंबोळी अकांची फवारणी करावी. आवश्यकता असल्यास आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी मॅलॅथियॉन ५o टक्के प्रवाही अगर डायमेथोएट ३o टक्के प्रवाही १० मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच जास्त प्रादुर्भावग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत.

साल पोखरणारी अळी

या किडींचा प्रादुर्भाव जुनी झाडे किंवा दुर्लक्षित बागेत जास्त प्रमाणात दिसून येतो. या किडीची अळी मळकट पिंगट कथ्या रंगाची, दंडगोलाकृती असून अंगावर लांब केस असतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३५ ते ४० मि.मी. लांब असते. पतंग भुरकट रंगाचा, मध्यम आकाराचा व मजबूत बांध्याचा असतो. अळी प्रथम साल खाऊन त्याचा भुगा व लाळ यांच्या साहाय्याने तेथे तोंडापासून जाळे तयार करते. नंतर ती खोडात छिद्र करते. छिद्राच्या राहून रात्रीच्या वेळी बाहेर येते आणि भुयारी जाळ्यात राहून पुढेपुढे साल खाते आणि जाळे तयार करीत असते. परिणामी अन्नपुरवठा खंडीत होऊन येतो, म्हणून वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

व्यवस्थापन

या किडीच्या व्यवस्थापनासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर याच कालावधीत विशेष लक्ष देऊन उपाययोजना करावी. यावेळी खोडात फारशी छिद्रे झालेली नसतात, बहुदा बाहेरच जाळे असतात. ती नष्ट करावीत. यानंतर जाळ्याच्या एका टोकास पाहिल्यास छिद्र दिसेल. प्रथम जाळे स्वच्छ करून त्यात अणकुचीदार तार घालून वरखाली करावी म्हणजे आतील अळी मरेल. या छिद्रात तेल देण्याच्या पिचका-यांच्या साहाय्याने डी.डी.व्ही.पी.चे द्रावण टाकावे. हा प्रभावी उपाय पुन्हा पुन्हा करावा. तसेच झाडावर व फांद्यावर या कीटकनाशकाची फवारणी करावी.

पांढरी माशी

या किडीची पिले आणि प्रौढ माशा सतत पानातून रस शोषण करित असतात. रस शोषण करतांना ही कोड पानावर चिकटगोड पदार्थ सोडतात.

परिणामी त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन पाने, फळे व फांद्यासहित झाड काळे पडते. त्यामुळे पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येतो. त्यामुळे उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम होतो. अशा फळांना अतिशय कमी भाव मिळतो.

एकात्मिक पीक संरक्षण (सारांश)

  1. बागेमध्ये स्वच्छ सुर्यप्रकाश राहील व हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी.
  2. बाग तणविरहित ठेवावी.
  3. रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी जैविक व्हर्टिसिलियम ५० ग्रॅम + १०० मि.ली. दुधात घेऊन ते १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
  4. फळमाशीच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा वापर करावा.
  5. मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा पावडर (१oo ग्रॅम प्रती झाड) शेणखतात मिसळून मातीत टाकावी. अथवा १ टका बोडॉमिश्रणाची मातीत जिरवणी करावी.
  6. फळांवरील डागांसाठी बाविस्टीन (o.१ टक्के) + मॅन्कोझेब (o.२ टक्के) ची फवारणी करावी.

1 thought on “पेरू लागवड तंत्रज्ञान”

Leave a Comment